Thursday, 5 December 2019

राकेश सावंत यांच्या 'मुद्दा ३७० जे अँड के' चित्रपटाचा भव्य संगीत अनावरण कार्यक्रम



प्रसिद्ध रहेजा क्लब क्लासिकमध्ये  'मुद्दा ३७० जे अँड के' ह्या चित्रपटाचा म्युजिक लाँच सोहळा भव्य प्रकारे पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माता भंवर सिंह पुंडीर, दिग्दर्शक राकेश सावंत, राखी सावंत, हितेन तेजवानी, अंजलि पांडे, अदिता जैन, ज़रीना वहाब, मोहन कपूर, गायक मुदासिर अली,  साहिल मुल्ती खान आणि  निसार अख्तर यांच्यासह अन्य कलाकार आणि क्रू देखील हजर होते. या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे सईद अहमद, साहिल मुल्ती खान और राहुल भट्ट यांनी तर बोल लिहले आहेत निसारअख्तर, सीमा भट्ट और शाहिद अंजुमन यांनी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, शान, पलक मुंचाल, असीस कौर, शाहिद माल्या, मुद्दसर अली, अविक दोजन चॅटजी ह्या चित्रपटाची गाणी गायली आहेत.

पृथ्वीचे नंदनवन आणि भारताचा मुकुट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरची ही कथा आहे. 'मुद्दा ३७० जे अँड के' हा चित्रपट १९४७ नंतर अनेकदा युद्धाचे रणांगण बनलेल्या काश्मीरच्या कधी नयनरम्य तर कधी रक्ताने माखलेल्या घटनांचे दर्शन घडवितो. जम्मू-काश्मीरने कधी बंडखोर बर्फ लाल झाल्याचे पाहिले आहे तर कधी सीमा ओलांडलेल्या दहशतवादामुळे काश्मीरच्या नयनरम्य सुंदर परिसरात बंदुकीची बारुद विखुरताना पाहिली आहे

ही कथा विस्थापित काश्मिरी पंडितांविषयी, त्यांच्या वेदना आणि त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीत निर्वासित बनलेल्या पीडितांबद्दल आहे. अनेक दशकांपासून काश्मिर कलम ३७० आणि ३५ (ए) सारख्या कायद्यांच्या जखमांनी वेढले आहे. परंतु तरीही या सुफियाना काश्मीरने बर्‍याच काळापासून तग धरत आपले अस्तित्व गमावत नाही, कदाचित यामुळेच येथे काश्मिरी पंडित दीनानाथ यांचा मुलगा सूरज आणि मुस्लिम मुलगी अस्मा यांच्या प्रेमाला अमरत्व प्राप्त होते.

ही कथा १९८९ चा काळ दर्शवते जेव्हा सुरज आणि आसमा स्वप्नांमध्ये त्यांच्या प्रेमाचे रंग भरत दहशतवादी सीमा पार करते. सूरज आणि अस्माच्या प्रेमामुळे रक्तपात होईल का? दिग्दर्शक राकेश सावंत यांचा 'मुद्दा ३७० जे अँड के', जम्मू-काश्मीरच्या राजकीय मैलाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरच्या भावना आशा आणि प्रेम नवीन वळण घेत असताना दिसून येणार आहे.

या चित्रपटात हितेन तेजवानी, मनोज जोशी, राज झुशी, जरीना वहाब, पंकज धीर, अनीता राज, मोहन कपूर, सुजाता मेहता, अंजन श्रीवास्तव, भंवर सिंह पुंदिर, शाबाझ खान, ब्रिज गोपाळ, मास्टर अयान आणि राखी सावंत यांचा समावेश असेल तसेच अंजली पांडे व तन्वी टंडन या नवोदित कलाकारांचा परिचय देखील करून दिला जाईल.

हा चित्रपट १३ डिसेंबर २०१९ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.

No comments:

Post a Comment